नीरज गुंडे यांच्याशी विद्यमान मुख्यमंत्र्यांचे अधिक घनिष्ठ संबंध – नवाब मलिक

नीरज गुंडे हे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. तसेच ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पर्वपरिचित आहेत. २०१४ – २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना पक्षाच्या युती दरम्यान नीरज गुंडे हे संवादक होते. तसेच त्यांची नेहमी मातोश्री आणि जुन्या महापौर बंगल्यावर नियमित ये-जा होत असे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याच अल्पसंख्यांक मंत्री नविब मलिक यांनी आरोपसत्रात नीरज गुंडे यांच्याबद्दल अनेक आरोप करण्यात आले. तसेच नीरज गुंडे आणि विद्यमान मुख्यमंत्री यांचे अधिक घनिष्ट संबंध असल्याचे नवाब मलिकांनी सांगितले होते. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांना प्रत्युत्तर दिले आहे.