Jaimaharashtra news

INDvWI : विंडिज विरुद्ध दुसरी टी-20, इंडियाला मालिका जिंकण्याची संधी

तिरुअनंतपुरम : विंडीज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरी टी-20 मॅच आज तिरुवनंतपुरम येथे खेळली जाणार आहे. या मॅचला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. सीरिजच्या दृष्टीने दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्वपूर्ण आहे.

टीम इंडियाने 3 मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजची मॅच जिंकून मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी टीम इंडियाकडे आहे. तर मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विंडिजसाठी करो या मरोची परिस्थिती आहे.

टीम इंडियाने हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या टी-20 मध्ये विंडिजचा 6 विकेटने पराभव केला होता.

टीम इंडियाला आजची मॅच जिंकून आणखी एक रेकॉर्ड करण्याची संधी आहे. टीम इंडियाने नोव्हेंबर 2018 पासून ते आतापर्यंत विंडिज विरुद्ध 7 टी-20 सामने खेळले आहेत.

या सातही मॅचमध्ये टीम इंडियाने विंडिजचा पराभव केला आहे. त्यामुळे आजचाही सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाचे प्रयत्न असतील.

टीम वेस्टइंडिज
कायरन पोलार्ड (कर्णधार), फेबियन ऍलन, शेल्डन कॉट्रेल, शिमरन हेटमायर, जेसन होल्डर, ब्रेंडन किंग, एव्हीन लुईस, कीमो पॉल, निकोलास पूरन, कारी पीएरे, दिनेस रामदीन, शेरफन रदरफोर्ड, लेंडल सिमन्स, हेडन वॉल्श, किसरिक विलियम्स

टीम इंडिया
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेट कीपर), मनिष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

Exit mobile version