Sat. Dec 14th, 2019

जबरदस्त धोनी – मैदानातही राखला तिरंग्याचा मान

टीम इंडिया तिसऱ्या टी 20 सामन्यात 4 धावांनी पराभूत झाली. न्यूझीलंडने  दिलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारतीय संघाने 208 धावाच केल्या. विजय शंकर, ऋषभ पंत, कृणाल पांड्या आणि दिनेश कार्तिक या चार फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी केली. पण या चौघांच्या फटाकेबाजीनंतरही भारताचे प्रयत्न 4 धावांनी तोकडे पडले. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने मैदानावरील आपल्या कृत्याने भारतीय चाहत्यांना पुन्हा एकदा वेड लावले.

धोनीने राखला तिरंग्याचा मान

टीम इंडिया तिसऱ्या टी 20 सामन्यात महेंद्रसिंग धोनीला धमाकेदार खेळता आले नाही. तरीही यष्टीरक्षक म्हणून त्याने आपली भूमिका चोख बजावली.

पण यावेळी धोनी एका वेगळ्याच कारणाने चाहत्यांमध्ये झळकला.

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडच्या फलंदाजीच्या वेळी 14व्या षटकात मैदानात अचानक एक चाहता धोनीच्या दिशेने धावत आला.


चाहत्याच्या हातात भारताचा ध्वज होता.

तो चाहता धोनीकडे धावत येऊन त्याच्या पाया पडला.

चाहता धोनीच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला, त्यामुळे त्याच्या हातातील तिरंगाही जमिनीवर गेला.

धोनीने तिरंग्याचा मान ठेवत तो तिरंगा हातात घेतला आणि तिरंग्याचा अपमान होऊ दिला नाही.

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून चाहत्यांच्या मनातील धोनीविषयी आदर, सन्मान वाढत असल्याचे कमेंट्स मधून दिसते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *