Mon. Jul 6th, 2020

भारत पाकिस्तान हायव्होल्टेज फायनल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ओव्हलवर चॅम्पियन ट्रॉफीची फायनल रंगणार आहे. या फायनलमध्ये विराटसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चार वर्षांपूर्वी साहेबांना त्यांच्याच घरात धूळ चारून चॅम्पियन ठरलेल्या टीम इंडियापुढे पाकला पराभूत करुन जेतेपद कायम राखण्याचं आव्हान असणार आहे.

 

आयसीसी स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात दोन सामने होणं हा प्रसंग तसा निराळा पण यंदा ते घडलं. आज होणाऱ्या फायनलआधी 4 जूनला भारताने साखळी सामन्यात पाकिस्तानला अस्मान दाखवलं होतं. कामगिरीत सातत्य असलेला भारतीय संघ विरुद्ध नशीबाच्या जोरावर अखेरचा टप्पा गाठणाऱ्या पाकिस्तानमध्ये हा सामना रंगणार आहे. दोन्ही देशांच्या फॅन्समध्ये या हायव्होल्टेज मॅचकरता प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *