Wed. Aug 4th, 2021

इंदापूरात महावितरण कार्यालयासमोर भाजपच्या वतीने वीज बिलाची होळी

महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक यांना आलेले भरमसाठ वीजबिल माफ करावे

महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक यांना आलेले भरमसाठ वीजबिल माफ करावे या मागणीसाठी भाजपच्या वतीने इंदापूर मध्ये महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करत विज बिलांची होळी करण्यात आली होती. या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने वीज बिलामध्ये सवलतीची घोषणा केली होती मात्र आता ऊर्जामंत्री वीजबिलात माफी देणे शक्य नसल्याचे सांगत आहे.

‘सरकारने जनतेला धीर देण्या ऐवजी त्यांच्यावर अवाजवी वीजबिल आकारून जनतेच्या भावनांशी खेळण्याचे काम करत आहे. जर सरकारने सरसकट विज बिलात माफी दिली नाही तर तीव्र आंदोलन करू’ असा इशारा भाजपाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *