Mon. May 17th, 2021

#ModiInFrance भारत- फ्रान्सची अतूट मैत्री – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर असून दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्समधील भारतीयांशी संवाद साधला. मोदींनी भारतात केलेल्या कामांचा पाढा वाचत भाषण संपवले. तसेच भारत- फ्रान्सची मैत्री अतूट असल्याचे मोदींनी यावेळी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

पंतप्रधान नेरंद्र मोदी दोन दिवसांपासून फ्रान्स दौऱ्यावर असून फ्रान्समधील भारतीयांशी संवाद साधला.

आजचा दिवस भारत-फ्रान्समधील मैत्रीचा असल्याचे मोदींनी म्हटलं आहे.

आम्ही अशक्य ध्येय डोळ्यासमोर ठेवले असल्याचे मोदी म्हणाले.

तसेच दिलेले वचन पूर्ण करण्यास विसरत नसल्याचे मोदींनी सांगितले.

आम्हाला मिळालेलं बहुमत हे नव्या भारताच्या निर्मितीसाठी आहे, असे मोदींचे म्हणं आहे.

भारतात गेल्या 5 वर्षात सकारात्मक बदल होत असल्याचा दावा केला आहे.

जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना भारतात असल्याचेही मोदी म्हणाले.

भारत वेगाने गरीबीतून बाहेर येतोय असा दावा मोदींनी केला.

तसेच 2025पर्यंत भारत टीबीमुक्त होणार असं मोदी म्हणाले.

कामांचा वेग पाहता सर्व लक्ष 2025पर्यंत पूर्ण होतील.

भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरोधात कडक कारवाई सुरू असल्याचे मोदी म्हणाले.

तिहेरी तलाक रद्द करून मुस्लिम महिलांचा सन्मान राखला.

चंद्रावर उतरणारा भारत जगात चौथा क्रमांकावर असल्याचे मोदी म्हणाले.

इन्फ्रा म्हणजे भारत आणि फ्रान्सच्या मैत्रीचे समन्वय.

गणेशोत्सव फ्रान्समधील सर्वांत मोठा सण असल्याचे मोदी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *