Wed. Jul 28th, 2021

Pulawama Terror Attack नंतरही भारत-पाक व्यापारात चक्क 7% वाढ

पाकिस्तानच्या जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेने 14 फेब्रुवारी रोजी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान शहीद झाले होते.

यानंतर भारत आणि पाकिस्तान  या दोन्ही  देशांत  युद्धपातळीवर चर्चा सुरु आहे.

आणि यातच समोर आलेली आश्चर्यकारक बाब म्हणजे या दोन्ही देशांतील व्यापारात झालेली वाढ

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील व्यापार गेल्या सात महिन्यांत सात टक्क्यांनी  वाढला आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा व्यापारानुकूल देशाचा दर्जा काढून घेतला आहे.

भारताने पाकिस्तानी वस्तूंवर 200 टक्के आयात कर लावला आहे.

मुळातच हा व्यापार काही दशलक्ष डॉलर्स इतका असल्याने याचा पाकिस्तानला फारसा फटका बसणार नाही, असे ‘डॉन’ या वृत्तपत्रात म्हटलं आहे.

भारत व पाकिस्तान देशांतील व्यापार

दोन्ही देशांतील व्यापार जुलै-जानेवारी 2018-19 दरम्यान 1.122 अब्ज डॉलर्स होता, तो 4.96 टक्के वाढला आहे.

2017 च्या दरम्यान 1.069 अब्ज डॉलर्स होता. आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांत भारताची पाकिस्तानाला निर्यात एकूण व्यापाराच्या 79.33टक्के आहे.

पाकिस्तानची भारतातील आयात जुलै जानेवारी दरम्यान 890.05 दशलक्ष डॉलर्स होती.ती याआधी 871.71 डॉलर्स होती.2.11 टक्के व्यापार वृद्धीने पाकिस्तानची आयात वाढ भारत वगळता सर्व देशांसाठी २.११ टक्के झाली होती.

भारताची पाकिस्तानला निर्यात 1.64 अब्ज डॉलर्स होती 2017-18 मध्ये 1.84 अब्ज डॉलर्सची झाली.  त्यामुळे पुढील काळात व्यापारवृद्धी होत गेली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *