Mon. Jan 24th, 2022

दहशतवादाच्या विरोधात भारत-रशिया एकसाथ

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांची दोन वर्षानंतर भेट झाली आहे. हैदराबादयेथील हाऊसमध्ये पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष यांची बैठक सुरू आहे. दहशतवाद्यांच्या विरोधात नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात प्रदिर्घ काळ चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

कोरोना काळात देशाची आर्थिक व्यवस्था अडचणीत आली होती. त्यामुळे कोरोनाच्या लढाईत देशाला रशियाची मदत मिळाली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. तसेच भारत आणि रशिया या दोन देशांमधील संबंध अधिक मजबूत झाले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची २०१९मध्ये ब्राझिलिया येथे झालेल्या बीआरआयसीएस परिषदेच्या दरम्यान भेट झाली होती. त्यानंतर आता राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान आज त्यांची हैद्राबाद येथील हाऊसमध्ये बैठक पार पडली. भारत-रशिया देशांचे संबंध अधिक मजबूत असून दहशतवादाच्या विरोधात भारत-रशिया एकसाथ असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *