दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघात धोनीला स्थान ?

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ट्वेन्टी-२० सामना सुरू होणार आहे. या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी 4 सप्टेंबर रोजी संघ निवडण्यात येणार असल्याचे म्हटलं जात आहे. मात्र या संघामध्ये माजी कॅप्टन कूल धोनीचा समावेश केला जाणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना उपस्थित झाला आहे. बीसीसीआयने अद्याप धोनीशी निवृत्तीबाबत चर्चा केली नसल्याची माहिती समोर आली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ट्वेन्टी-२० सामना सुरू होणार आहे.
येत्या 15 सप्टेंबरपासून ट्वेन्टी-२० सामना रंगणार आहे.
या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी 4 सप्टेंबर रोजी संघ निवडण्यात येणार आहे.
सध्या ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० वर्ल्ड कपसाठी संघबांधणी करण्यात येत आहे.
त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यातील संघामध्ये बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटलं जात आहे.
मात्र या सामन्यात महिंद्र सिंग धोनीचा समावेश असणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मात्र अद्याप बीसीसीआयने धोनीशी निवृत्तीबाबत चर्चा केली नसल्याची चर्चा केली जात आहे.