Wed. May 22nd, 2019

#INDvsAUS4thODI : अटी-तटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय

51Shares

भारताने ऑस्ट्रेलियाला ३५९ धावांचे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने अटी-तटीच्या सामन्यात विजय मिळवला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज चौथा एकदिवसीय सामना सुरू होता. भारताने या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती.  रांचीमध्ये झालेल्या तिसऱ्या सामान्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून या मालिकेत २-१ अशी आघाडी झाली आहे. भाराताने नाणेफेक जिंकत यावेळी फलंदाजी करण्याची निर्णय घेतला. यावेळी भारताने ३५९ धावा केल्या. के. राहुल, रिषभ पंत, चहल, भुवनेश्वर यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. रोहित शर्माने आज ९३ धावा करत धडाकेबाज खेळी केली.

चौथा एकदिवसीय सामना –

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या चौथा एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने नाणेफेकी जिंकली.

नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारताने ३५९ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला दिले आहे.

रोहित शर्माने ९२ चेंडूत ९५ धावा केल्या आणि शतक होण्यापूर्वी बाद झाला.

तसेच शिखर धवनने १४३ धावा करत माघारी गेला.

या दोघांच्या धमाकेदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला एवढे मोठे आव्हान दिले आहे.

रांची येथे झालेल्या तिसऱ्या सामान्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आणि २-१ ची आघाडी झाली.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *