Mon. Aug 15th, 2022

मुष्टियुद्धात भारताला कांस्यपदक; लवलिनाचा उपांत्य फेरीत पराभव

टोकियो ऑलिम्पिकमध्ये मुष्टियोद्धा लवलिना बोर्गोहेनने कांस्य पदकाची कमाई केली असून ऑलिम्पिकमध्ये लवलिना बोर्गोहेनचा उपांत्य फेरीत पराभव झाला आहे. त्यामुळे लवलिनाचं सुवर्णपदकाचं स्पप्न भंगलं. बॉक्सिंग स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात लवलिनाला पराभवाचा सामना करावा लागला. टर्कीच्या प्रतिस्पर्धीसोबच उपांत्य फेरीच्या लढतीत लवलिनाचा पराभव झाला.

महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं इतिहास रचला आहे. उपांत्य फेरीत जरी तिचा पराभव झाला असला, तरी तिनं देशासाठी पदक जिंकलं आहे. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं लवलीनाचा पराभव केला. लवलीनानं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती. या विजयासह लवलीनानं इतिहास रचत भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं होतं.

६९ किलोग्राम गटात लवलीना भारताकडून पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. लवलीनाकडे भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी आहे. मात्र यासाठी लवलीनाला आणखी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.