Mon. Jun 14th, 2021

परदेशात नोकरी,शिक्षणासाठी जाणाऱ्यांचा मार्ग मोकळा

केंद्रीय आरोग्य विभागाने परदेशात शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना कोविशिल्ड लशीची दुसरी मात्रा देण्याबाबत एक निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार परदेशात शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना २८ दिवसानंतर आणि ८४ दिवसांच्या आत घेण्याची मुभा केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेमुळे अडकून राहिलेल्या विद्यार्थ्यांचा परदेशी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या नव्या नियमावलीनुसार, कोविशिल्ड लशीची दुसरी मात्रा ८४ दिवसांनतर घेता येणार आहे. परदेशात शिक्षणासाठी, तसेच नोकरीसाठी विशिष्ट कालावधीमध्ये हजर राहणे आवश्यक असणारे अनेक जण यामुळे अडचणीत सापडले होते. यासंबंधी अनेक तक्रारी आरोग्य विभागापर्यंत गेल्यानंतर आरोग्य विभागाने या नियमात बदल केले आहेत.

अशा व्यक्तींच्या दुसऱ्या मात्रेच्या लसीकरणासाठी कोचीन ऍपमध्ये नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी या व्यक्तींना संबंधित कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल. या व्यक्तींच्या लसीकरणासाठी ओळखपत्र म्हणून पारपत्राची नोंदणी करावी, जेणेकरून लसीकरण प्रमाणपत्रावर पारपत्राचा क्रमांक नोंद होईल.

ही सुविधा ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत लागू असेल असेही नमूद करण्यात आले आहे.दुसरी मात्र घेण्याकरिता विद्यापीठात प्रवेश झाल्याची कागदपत्रे, परदेशात शिकत असणारे परंतु सध्या भारतात आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी परत जाण्याची कागदपत्रे, मुलाखत किंवा नोकरीमध्ये नियुक्ती झाल्याची कागदपत्रे, टोकियोतील ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी नामांकित झालेल्याची कागदपत्रे ही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *