Thu. Aug 13th, 2020

भारत चीन युद्धाचं काऊंटडाऊन सुरु- चायना डेलीमधून भारताला इशारा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

डोकलाम प्रश्नावरुन चिनी ड्रॅगन शांत होण्याचं नाव घेत नाही. भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव संपुष्टात आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. पण चीननं पुन्हा युद्धाची भाषा सुरु केली.

 

भारत आणि चीनच्या लष्करी संघर्षाचं काऊंटडाऊन सुरु आहे अशा तिखट शब्दात  चायना डेली या चीनच्या सरकारी वृत्तपत्रानं भारताला पुन्हा एकदा धमकी दिली. तसंच भारत चीन युद्धाला केव्हाही सुरुवात होऊ शकते असे संकेत चायना डेलीच्या संपादकीय लेखात देण्यात आले. भारतानं चीनमध्ये घुसखोरी केली अशा शब्दात चायना डेलीमधून गरळ ओकण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *