Thu. Sep 16th, 2021

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ४० हजाराच्यावर आढळणारी रुग्णसंख्या मंगळवारी ३० हजारांवर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सोमवारी ३० हजार ५४९ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ४२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार , सोमवारी ३८ हजार ८८७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी ०८ लाख ९६ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या ४ लाख ०४ हजार ९५८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

राज्यात सोमवारी ४ हजार ८६९ नवीन कोरोनाबाधित आढळले असून ८ हजार ४२९ रूग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. तसेच ९० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,०३,३२५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६५ टक्के झाले आहे. राज्यात सध्या एकूण ६३ लाख १५ हजार ६३ सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *