Thu. Sep 23rd, 2021

देशात शुक्रवारी ३९ हजार ९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

देशात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी ३९ हजार ९७ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, तर ५४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच शुक्रवारी ३५ हजार ८७ जण बरे झाले आहेत. देशात सध्या ४ लाख ८ हजार ९७७ रुग्णांवर उपचार सुरु असून देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी १३ लाख ३२ हजार १५९ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३ कोटी ०५ लाख ०३ हजार १५९ रुग्ण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत एकूण ४ लाख २० हजार १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात शुक्रवारी ६ हजार ७५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ५ हजार ९७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यामधील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ९६.३३ टक्के इतका झालाय. शुक्रवारी राज्यात १६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत शुक्रवारी ३७४ बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९७% इतका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *