Mon. Jan 17th, 2022

देशात गुरुवारी ४४ हजार ६४३ नवे कोरोनाबाधित

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच असून सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. देशात गुरुवारी ४४ हजार ६४३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ५३३ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी १८ लाख १२ हजार ११४ इतकी झाली आहे.

देशात सध्या ४ लाख ११ हजार ७६ रुग्ण उपचाराधीन आहेत, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३७ टक्के इतके आहे.तसेच आतापर्यंत एकूण ४ लाख २६ हजार २९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

दैनंदिन रुग्णवाढीचा दर २.५८ टक्के नोंदला गेला, तर साप्ताहिक रुग्णवाढीचा दर २.३७ टक्के इतका नोंदला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी ९ लाख ७४ हजार ७४८ जण करोनामुक्त झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *