Wed. Aug 10th, 2022

देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये चढउतार कायम

देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. मंगळवारी कोरोना रुग्णांची संख्या ३० हजार आढळून आली होती. पण, मंगळवारपासून देशात ४२ हजार ०१५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत आज वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. मंगळवारपासून ३६ हजार ९७७ रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. काळजीची गोष्ट म्हणजे मंगळवारपासून ३ हजार ९९८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
देशातील दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट २.२७ टक्के आहे. गेल्या सलग ३० दिवसांपासून पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांपेक्षा कमी नोंदला गेला आहे. त्यामुळे ही दिलासादायक बाब आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे ३ कोटी १२ लाख १६ हजार ३३७ रुग्ण आढळून आले आहेत, तर ३ कोटी ०३ लाख ९० हजार ६८७ रुग्णांनी कोरोनावर मात केलीये. देशात सध्या कोरोनाचे ४ लाख ०७ हजार १७० सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना विषाणूने आतापर्यंत ४ लाख १८ हजार ४८० लोकांचा बळी घेतलाय.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.