Wed. Aug 10th, 2022

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास चीनचा खोडा

पुलवामा येथे 14 फेब्रुवारी दहशतवादी हल्ला झाला.यामध्ये सीआरपीफचे 41 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेने घेतली. या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.यामध्ये चीनने पुन्हा एकदा खोडा घातला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला आहे. अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या अल कायदा निर्बंध समितीपुढे फ्रान्स, अमेरिका व ब्रिटन यांनी २७ फेब्रुवारी रोजी मांडला होता. तांत्रिक अडचणीचा मुद्दा उपस्थित करत चीनने या प्रस्तावाला विरोध केल्याचे समजते आहे.

मसूदला दहशतवादी ठरवण्यासाठी भारताच्या मोर्चेबांधणी

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या अल कायदा निर्बंध समितीपुढे मांडण्यात आला.

फ्रान्स, अमेरिका व ब्रिटन या देशांनी भारताची बाजू घेत २७ फेब्रुवारी रोजी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

या प्रस्तावास आक्षेप घेण्याबाबत समितीच्या सदस्यांना १० दिवसांची मुदत देण्यात आली होती.ही मुदत बुधवारी संपली.

समिती सदस्यांच्या मताच्या आधारे याबाबत निर्णय घेण्यात आला यामध्ये चीनने पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीचा मुद्दा उपस्थित करत प्रस्तावासंदर्भात नकाराधिकार वापरला.

प्रस्तावाची मुदत १३ मार्चला संपणार असल्याने त्याआधी भारताने अनेक देशांच्या प्रतिनिधींना भेटून मोर्चेबांधणी केली होती.

भारताच्या मोर्चेबांधणीमुळे 10 हून अधिक देशांनी या प्रस्तावाला पाठींबा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

चीनने २००९, २०१६, २०१७ असा तीनदा अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावावर नकाराधिकार वापरला होता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.