एशियन गेम्स 2018 : आशियाई स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी

 इंडोनेशियात गेल्या 14 दिवसांपासून सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंतच्या इतिहासात चांगली कामगिरी केली आहे.

या स्पर्धेची खेळांची चुरस आज संपली आहे, भारताने 14 व्या दिवशी 2 सुवर्ण पदके कमावली आहेत.

आपल्या या खेळातून भारतीय चाहत्यांना त्यांनी अविस्मरणीय गोड आठवणी दिल्या. भारताची पदसंख्या 69 एवढी झाली आहे. यामध्ये 15 सुवर्ण पदके, 24 रौप्य आणि 30 कांस्य पदकांचा समावेश आहे.

 बॉक्सर अमित पांघलने 49 किलो वजनी गटात, तर प्रणब बर्धन-शिबनाथ या दोघांनी ब्रिज क्रीडा स्पर्धेच्या दुहेरी पुरूष गटात सुवर्णपदक जिंकले.

एवढंच नव्हे तर भारताने स्क्वॉशमध्ये ही एका रौप्य पदकाची कमाई केली. तसेच भारतीय पुरुष हॉकी संघाने भारताला कांस्यपदक जिंकवून दिले. हि भारताची ही सर्वोत्तम महत्वाची कामगिरी ठरली आहे.

भारताने यंदाच्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक 69 पदके मिळवली. तर 2010 सालच्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताला 65 पदके मिळवण्यात यश आले होते.

यापुर्वी 1982 साली नवी दिल्लीत झालेल्या स्पर्धांमध्ये भारताने 57 पदकांची कमाई केली होती. याशिवाय, 2006 साली झालेल्या दोहा स्पर्धेत (53), 1962 सालच्या जकार्ता स्पर्धांमध्ये (52) आणि 1951 मध्ये नवी दिल्लीतील स्पर्धांमध्ये (51) भारताला पदकांची अर्धशतक गाठता आले होते.

Exit mobile version