Sat. Sep 21st, 2019

वाघांच्या शिकारीत भारत पहिल्या क्रमांकावर !

गेल्या 19 वर्षांत जगातील 32 देशांमध्ये 1,977  वाघांची शिकार करण्यात आली आहे. तर 382 वाघांना जीवंत पकडण्यात आले आहे. एकट्या भारतातच या 19 वर्षांत 626 वाघांची शिकार करण्यात आली असून वाघांच्या शिकारीत भारत पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

0Shares

गेल्या 19 वर्षांत जगातील 32 देशांमध्ये 1,977  वाघांची शिकार करण्यात आली आहे. तर 382 वाघांना जीवंत पकडण्यात आले आहे. एकट्या भारतातच या 19 वर्षांत 626 वाघांची शिकार करण्यात आली असून वाघांच्या शिकारीत भारत पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केंब्रिज येथील ट्रॅफिक इंटरनॅशनल या एनजीओच्या सर्व्हे अहवालात ही माहिती नमूद करण्यात आली आहे.

19 वर्षात एवढ्या वाघांची शिकार

2000 ते 2018 पर्यंत हा सर्व्हे करण्यात आला आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक2,967 वाघ आहेत. जगातील वाघांची संख्या 3,951 असून त्या तुलनेत भारतात 75.09 टक्के वाघ आहेत.

मात्र गेल्या 19 वर्षांत भारतात 626  वाघांची शिकार करण्यात आली असून वाघांच्या शिकारीची ४६३ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. भारतानंतर वाघांच्या शिकारीत थायलंडचा नंबर लागतो.

थायलंडमध्ये वाघांच्या शिकारीच्या ४९ घटनांमध्ये ३६९ वाघांची शिकार करण्यात आली आहे. जप्तींच्या घटनांमध्ये एकूण 1142 वाघांचा मृत्यू झाला आहे.

एकट्या भारतातच या 19 वर्षांत 626 वाघांची शिकार करण्यात आली असून वाघांच्या शिकारीत भारत पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *