Fri. Sep 17th, 2021

#PulwamaTerrorAttack : पाकच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली आहे. आधी Most Favored Nation चा पाकिस्तानचा दर्जा काढून घेतलाय. त्यानंतर आता भारताने पाकला दुसरा झटका दिलाय. पाकिस्तानात भारताकडून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील बेसिक कस्टम ड्यूटी थेट 200% ने वाढवण्यात आली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे.


 

हे ही वाचा- #PulwamaTerrorAttack : भारताचा पाकला दणका

200% कस्टम ड्यूटीमुळे काय होणार?

भारत पाकिस्तानकडून साधारणतः 19 उत्पादनांची आयात करतं.

यामध्ये आंबे, पेरू, अननस, फॅब्रिक कॉटन, पेट्रोलियम गॅस, सिमेंट यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे.

मात्र या उलट भारतातून पाकिस्तानात 137 उत्पादनं निर्यात होतात.

टोमॅटो, कोबी, साखर, चहा, कापूस, रबर यांसारख्या उत्पादनांचा यात समावेश आहे.

वाघा बॉर्डरवरून या वस्तू पाकिस्तानात जातात.

या वस्तूंसाठी आता पाकिस्तानाला आता थेट 200% कस्टम ड्यूटी मोजावी लागणार आहे.

त्यामुळे 48.8 कोटी डॉलर्सच्या सामुग्रीवर त्याचा परिणाम होणार आहे.

2017-18 दरम्यान पाकिस्तानातून भारताने 48.8 कोटी डॉलर्स किमतीची आयात केली होती.

तर निर्यात 1.92 अब्ज डॉलर्सची केली होती.

या आधीही 2016- 17 मध्ये दोन्ही देशांदरम्यान 2.27 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला होता.

आता MFN चा दर्जा गमावल्यानंतर आणि 200% कस्टम ड्यूटी वाढवल्य़ावर पाकिस्तानचं खूप नुकसान होणार आहे

पाकिस्तानी व्यापाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता कमी होणार आहे.

हे ही वाचा- #PulwamaTerrorAttack : पुलवामा हल्ल्यांशी आमचा संबंध नाही: पाकचे स्पष्टीकरण

पाकिस्तानचं खरंच नुकसान होणार आहे का?

तज्ज्ञांच्या मते जरी या गोष्टींमुळे पाकिस्तानला अर्थव्यवस्था कोलमडण्याइतकं नुकसान होणार नाही.

दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे आधीच दोन्ही देशांमध्ये व्यापार कमी प्रमाणातच चालतो.

मात्र आधी MFN दर्जा काढून घेणं आणि 200% कस्टम ड्युटी वाढवणं यामुळे पाकिस्तानला भारताने अंगिकारलेल्या कठोर पाकविरोधी धोरणांची जाणीव तीव्रतेने झाली आहे.

हे ही वाचा- #PulwamaTerrorAttack – पाकिस्तान म्हणे भारतानेच केला हल्ला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *