Tue. Mar 9th, 2021

ब्रिटिश औषध उत्पादकाच्या लसीला मान्यता देणारा भारत पहिला देश ठरु शकतो…

ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीला आपातकालीन वापरासाठी भारतात मान्यता मिळू शकते….

पुढच्या आठवडयात ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीला आपातकालीन वापरासाठी भारतात मान्यता मिळू शकते. ब्रिटिश औषध उत्पादकाच्या लसीला मान्यता देणारा भारत पहिला देश ठरु शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार ब्रिटनमधील औषध नियंत्रक ऑक्सफर्ड लसीच्या मानवी चाचणीच्या डाटाचे विश्लेषण करत आहेत. भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्डच्या लसीचे उत्पादन करत आहे.

सिरमच्या बरोबरीने फायझर आणि भारत बायोटेकने लसीच्या आपातकालीन परवान्यासाठी अर्ज केले आहेत. पुढच्या महिन्यापासून भारताला आपल्या देशातील नागरिकांचे लसीकरण सुरु करायचे आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. विशेष म्हणजे ही लस स्वस्त आहे. भारतात CDSCO ने नऊ डिसेंबरला, तीन कंपन्यांनी आपातकालीन परवान्यासाठी केलेल्या अर्जाचा आढावा घेतला. सिरमसह अन्य दोन कंपन्यांकडून अतिरिक्त डाटा मागितला. सिरमने मागितलेला सर्व डाटा आता सादर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *