Wed. Oct 5th, 2022

अभिनंदन वर्धमानचा आई-वडिलांना अभिमान

पाकिस्तानी लढाऊ विमानांना पळवून लावण्याच्या प्रयत्नात कमांडर अभिनंदन यांना पाकनं कैद केलं.

आज ते भारतात परत येतील असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितलं.

चेन्नई-दिल्ली विमान दिल्लीतील धावपट्टीवर थांबले,तेव्हा सामान काढण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती.

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या आई-वडिलांकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. यावेळी प्रवाशांनी उभे राहून टाळ्यांनी निवृत्त एअर मार्शल एस.वर्धमान आणि शोभा वर्धमान यांचे स्वागत केलं.

आपल्या शूरवीर मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी हे दाम्पत्य अमृतसरला जात असताना तेथील प्रवाशांनी टाळ्या वाजवत, जयघोषासह त्यांचं स्वागत केलं.

अभिनंदनचा आई-वडिलांना अभिमान

चेन्नईहून दिल्लीला आलेले अभिनंदन यांचे आई-वडिल दिल्लीहून अमृतसरला निघाले.

तेव्हा तेथील प्रवाशांनी टाळ्या देत  जोशात त्यांचे स्वागत केलं. हस्तांदोलन करत प्रवाशांनी त्यांचे आभार मानले.

अमृतसरला वाघा बॉर्डरवर जाऊन ते इतर नागरिकांसह आपल्या शूर मुलाचे स्वागत करतील.

अभिनंदन यांच्या कुटुंबानं दुसऱ्या महायुद्धापासून हवाई दलात सेवा सुरु केली.

एअर मार्शल एस.वर्तमान यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मान झाला आहे.

“आमचा अभी जीवंत आहे, तो जायबंदी नाही. तो मानसिकदृष्ट्या अतिशय खंबीर आहे. तो खरा सैनिक आहे. आम्हांला त्याचा अभिमान आहे”, अशी प्रतिक्रिया अभिनंदन यांच्या वडिलांनी केली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.