Wed. Jun 23rd, 2021

#IndiaVsPakistan आज महामुकाबला रंगणार!

World Cup 2019 सुरू असून आज सगळ्यांचे लक्ष भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्याकडे लागले आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना इंग्लंडमधील मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात रंगणार आहे. हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारत- पाकिस्तान सामना –

आज भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना रंगणार आहे.

इंग्लंडमधील मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात हा सामना रंगणार आहे.

यापूर्वी भारताचा सामना दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरोधात झाला आहे.

या तिन्ही सामन्यांपैकी भारताने दोन सामना जिंकले आहेत.

न्यूझीलंडबरोबर झालेल्या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे रद्द करण्यात आला होता.

मात्र पाकिस्तान संघ 4 सामने खेळले आहेत.

त्यापैकी फक्त एकच सामना जिंकला आहे.

त्याचबरोबर World Cup मध्ये पाकला हरवण्याची परंपरा कायम राखणार असल्याचे कर्णधार विराट कोहलीने म्हटलं आहे.

या महामुकाबलासाठी भारतीय संघ सज्ज झाली असून पाकला नेहमी प्रमाणे हरवणार असल्याचे म्हटलं आहे.

मात्र भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाल्याने तो तीन आठवड्यांसाठी संघाबाहेर पडला आहे.

हा सामना कोण जिंकणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *