Jaimaharashtra news

देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ

सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरात २९ पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरात ३० पैशांची वाढ झाली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची वाढती मागणी वाढल्यामुळे त्याचे दरही उडी घेताना दिसत आहेत. इंधनाच्या दरात वाढ झाल्यानंतर राजधानीत पेट्रोल आज प्रतिलिटर ९६.४१ रुपये तर डिझेल ८७.२८ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. ४ मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यापासून किंमती विक्रमी पातळीवर पोहचल्या आहेत.

पेट्रोल आणि डिझेलचा विषय भारतामध्ये सध्या राजकीय दृष्टीकोनातून एक महत्वाचा मुद्दा बनला आहे. भारत हा जगात तिसरा क्रमांकावरील कच्चा तेलाचा आयात करणारा देश आहे .
२५ दिवसांत पेट्रोल ६.०९ रुपयांनी तर डिझेल ६.५० रुपयांनी महाग झाले आहे. एका अहवालानुसार, देशातील १३५ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. यावर्षी पेट्रोलच्या किंमतीत १३% वाढ होताना दिसत आहे .

पहा कोणत्या शहरात किती रुपयांनी विकले जाणार पेट्रोल डिझेल

> दिल्लीत पेट्रोल ९६.४१ रुपये तर डिझेल प्रति लिटर ८७.२८ रुपये

> मुंबईत पेट्रोल १०२.५८ रुपये तर डिझेल प्रति लिटर ९४.७० रुपये

> चेत्नईमध्ये पेट्रोल ९७.६९ रुपये तर डिझेल ९१.९२ रुपये प्रति लिटर

> कोलकातामध्ये पेट्रोल ९६.३४रुपये आणि डिझेल ९०.१२ रुपये प्रति लिटर

इंधन दरवाढीची कारणं काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. जगात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारे, देशांतर्गत तेल कंपन्या आधारभूत किंमत निश्चित करतात. यानंतर त्यावर परिवहन शुल्क, कर, डिलर कमिशन आकारला जातो. यामुळे, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शहरांनुसार बदलतात.

पेट्रोल दरवाढीचे परिणाम
– कच्च्या तेलाच्या उच्च दरामुळे आयात करणे अधिक महाग होईल.
– आरबीआय सरकारच्या वित्तीय पैशावरील व्याजदर वाढवू शकते.
– सरकारी अनुदानाचे बिल वाढेल.
– इंधन वापरावरील खर्च वाढेल.
– बाजारात अन्न आणि भाजीपाल्याच्या किंमतीत वाढ होईल.
– कच्च्या मालाची किंमत वाढेल.

Exit mobile version