Fri. May 7th, 2021

भारत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात जागतिक पातळीवर प्रथम स्थानी

भारतात अनेक मुद्यांवरून मोठ्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनांना नंतर आंदोलनाचे स्वरूप मिळून देशात अशांतीचे वातावरण निर्माण होते. यामुळे दंगली आणि निदर्शने होतात. यावर नियंत्रण म्हणून देशात नेटसेवा बंद केली जाते.

यावर्षीच्या जागतिक अहवालानुसार नेटसेवा बंद करण्यात भारत अव्वल स्थानी आहे. गेल्या काही वर्षात भारतात तब्बल 367 वेळा विविध ठिकाणी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

नुकताच देशात नागरिकत्व दुरूस्ती कायदा लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली. यामुळे अफवा पसरू नये याची खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

२०१२ पासून आतापर्यंत देशात एकूण ३६७ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. याची दोन मुख्य कारणे म्हणजे दहशतवाद आणि जातीय हिंसाचारामुळे झालेल्या दंगली.

देशात सर्वात जास्त वेळा जम्मू-काश्मीरमध्ये सरकारकडून इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. यामध्ये एकूण 180 वेळा नेट सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान ५ ऑगस्ट २०१९ ला जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

त्यानंतर देशात इतर अनेक राज्यात इंटरनेट सेवा बंद ठेवली होती. त्यात आसाममध्ये १२ वेळा, उत्तर प्रदेशमध्ये ११ वेळा तर पश्चिम बंगालमध्ये ९ वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती.

इतर देशांच्या तुलनेत भारतात इंटरनेट बंद करण्यात आलेल्या घटनांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षभरात जागतिक स्तरावर खंडित करण्यात आलेल्या इंटनेट सेवेमध्ये भारताची संख्या ६७ टक्के आहे.

यामुळे भारत नेट सेवा बंद ठेवण्यात जागतिक पातळीवर प्रथम स्थानी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *