Sun. Sep 19th, 2021

दिलासादायक! देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट

देशात कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असून रविवारी १ लाख १४ हजार ४६० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर बाधितांचे प्रमाण ५.६२ टक्क्य़ांपर्यंत घसरले आहे.

त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २ कोटी ८८ लाख ०९ हजार ३३९ इतकी झाली आहे. रविवारी २६७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा एकूण आकडा आता ३ लाख ४६ हजार ७५९ वर पोहचला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

रविवारी मृत्युमुखी पडलेल्या २ हजार ६७७ जणांपैकी ७४१ मृत्यू हे महाराष्ट्रातील, ४४३ तमिळनाडूतील, ३६५ कर्नाटकमधील, २०९ केरळमधील, १२० उत्तर प्रदेशातील तर ११८ पश्चिम बंगालमधील आहेत.

कोरोना चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण कमी होऊन ते ५.६२ टक्क्य़ांवर आले आहे. सलग १३ दिवस हे प्रमाण १० टक्क्य़ांहून कमी राहिलेले आहे,असेही मंत्रालयाने सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *