Fri. Dec 3rd, 2021

“भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभूत करावे” – सचिन तेंडुलकर

१४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीआफचे ४० जवान शहीद झाले. यामुळे देशासह जगभरात या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. बॉलिवूड सिनेसृष्टीतही याचा निषेध करण्यात आला आहे. तसेच नवज्योत सिंग सिद्धू यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना सोनीवरील द कपिल शर्मा शोमधून तसेच फिल्मसिटीतही बंदी घालण्यात आली आहे. आता पुलवामा हल्ल्याचा पडसाद क्रिकेटवर उमटताना दिसत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबर वर्ल्ड कप खेळावा का असा प्रश्न उपस्थित होत आहे.  या प्रश्नावर क्रिकेटचा देवता म्हणजेच सचिन तेंडुलकर यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे.

सचिन तेंडुलकरने काय ट्विट केले ?

सध्या पाकिस्तानबरोबर वर्ल्ड कप खेळावं की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारताने नेहमी पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली.

मात्र भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभूत करावे,

जर आपण खेळलो नाही तर पाकिस्तानला दोन गुण बहाल होतील.

मला असं वाटतं की आपण पाकिस्तानला दोन गुण बहाल देऊ नये.

मात्र देश जो निर्णय घेईल तो योग्य असेल असं माझं मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *