India Tour New Zeland : टीम इंडियाला धक्का, ‘हिटमॅन’ न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजला मुकणार

टीम इंडियाने न्यूझीलंडचा ५-० अशा फरकाने टी-२० सीरिजमध्ये पराभव केला. टीम इंडियाने न्यूझीलंडला व्हॉइटवॉश देत ऐतिहासिक कामगिरी केली. यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वनडे आणि टेस्ट मालिका खेळणार आहे. याआधी टीम इंडियाला मोठा धक्का झटका लागला आहे.
टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे त्याला उर्वरित वनडे आणि टेस्ट मालिकेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
रोहित शर्माला न्यूझीलंड विरुद्धच्या ५ व्या टी-२० सामन्यादरम्यान दुखापत झाली होती.
या दुखापतीमुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतावे लागले होते.
टी-२० सीरिजमधील रोहितची कामगिरी
रोहित शर्माने न्यूझीलंड विरुद्धच्या ५ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये दमदार कामगिरी केली होती. रोहित शर्माने या सीरिजमध्ये एकूण १४० धावा केल्या. यात त्याने २ अर्धशतक लगावले.
तिसऱ्या टी-२० मध्ये रोहितने महत्वाची कामगिरी केली. तसेच रोहितला चौथ्या टी-२० साठी विश्रांती देण्यात आली होती.
रोहितने पाचव्या टी-२० मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केलं होतं.
टीम इंडिया ५ फेब्रुवारीपासून न्यूझीलंड विरुद्ध ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. तर २१ फेब्रुवारीपासून २ टेस्टची सीरिज खेळण्यात येणार आहे.
वनडेसाठी अशी आहे टीम इंडिया
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रुषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जस्प्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी , शार्दुल ठाकूर आणि केदार जाधव.
न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिज
पहिली वनडे, ५ फेब्रुवारी, सिडन पार्क, हॅमिल्टन.
दुसरी वनडे, ८ फेब्रुवारी, इडन पार्कस ऑकलंड.
तिसरी वनडे, ११ फेब्रुवारी, बे ओव्हल, माऊंट मांगनुई
न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिज
पहिली टेस्ट , २१ फेब्रुवारी – २१ फेब्रुवारी, वेलिंग्टन.
दुसरी टेस्ट , २९ फेब्रुवारी – ४ मार्च, खाइस्ट चर्च
रोहितला या वनडे आणि टेस्ट सारिजला मुकावं लागलं असल्याने टीम इंडियासाठी हा मोठा धक्का आहे. दरम्यान टीम इंडियामध्ये रोहितच्या जागी वनडे आणि टेस्टमध्ये कोणाला स्थान मिळते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
रोहित शर्माच्या आधी ‘गब्बर’ शिखर धवनला दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागले होते. यामुळे धवनच्या जागी टी-२० मध्ये संजू सॅमसनला संधी दिली होती. तर वनडेमध्ये पृथ्वी शॉ याला संधी देण्यात आली आहे.