भारतीय संघाचा श्रीलंका दौरा संकटात

मुंबई : भारतीय संघ जुलै महिन्यात मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. मात्र श्रीलंकेत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यामुळे भारतीय संघाच्या दौऱ्यावर अनिश्चिततचे सावट निर्माण झाले आहे. तसेच भारतात सुद्धा परिस्थितीत ही फार गंभीर आहे. त्यामुळे या दौऱ्याबाबत सशांकता निर्माण झाली आहे. श्रीलंकेत मंगळवारी २ हजार ५६८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात ३८ लोक परदेशातून आले आहेत. श्रीलंकेत दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका होणार की नाही, याबाबत सशांकता निर्माण झाली आहे. दरम्यान, उभय संघात १३ जुलैपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर २२ जुलैपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. हे सामने कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत. तसेच ही मालिका विनाप्रेक्षक खेळवण्यात येणार आहे.

Exit mobile version