Fri. Dec 3rd, 2021

INDvsAUS, 2nd Odi : दुसरा सामना शुक्रवारी, टीम इंडियासाठी ‘करो या मरो’

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी वनडे मॅच शुक्रवारी खेळण्यात येणार आहे. हा सामना राजकोट येथे खेळला जाणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा सामना टीम इंडियासाठी सीरिजच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पहिल्या वनडेमध्ये १० विकेटने दारुन पराभव केला. यामुळे ऑस्ट्रेलियाने ३ मॅचच्या सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.

सीरिजमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला शुक्रवारी होणारी मॅच जिंकणं आवश्यक असणार आहे.

पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या मीडल ऑर्डरने निराशा केली होती. त्यामुळे चांगली सुरुवात मिळून देखील टीम इंडियाला मोठा आकडा गाठता आला नव्हता.

त्यामुळे राजकोटमधील दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या बॅट्समनकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंत जखमी झाला होता. त्यामुळे त्याऐवजी संघात दुसऱ्या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे.

तसेच पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना एक विकेटही घेता आला नाही.

त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल. तर दुसरी मॅच जिंकून सीरिज जिंकण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाचा असेल.

दरम्यान टीम इंडियाने दुसऱ्या वनडेसाठी नेटमध्ये कसून सराव केला आहे. या सरावाचे फोटो बीसीसीआयने ट्विट केले आहे.   

टीम इंडिया : विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर.

टीम ऑस्ट्रेलिया: एरॉन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, मार्नस लाबुशैन, स्टीव स्मिथ, एलेक्स कॅरी, पॅट कमिंस, एश्टन अगर, पीटर हॅंड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, केन रिचर्डसन, डी आर्सी शॉर्ट, मिचेल स्टार्क, एश्टन टर्नर, एडम झॅम्पा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *