टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला

सिडनीमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. शिवाय विजयी आव्हान टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 2 चेंडूआधी पूर्ण केलं होते. हार्दिक पांड्याने 22 चेंडूत नाबाद राहून 42 धावा काढत विजयाच्या शिखरावर टीम इंडियाला पोहचलं तर शिखर धवनने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीनेही 40 धावा केल्या. शिखर धवन आणि केएल राहुल या जोडीने 56 धावांची सलामी भागीदारी केली. यादरम्यान शिखर धवनने आपले अर्धशतक पूर्ण केलं.

टीम इंडियाकडून थंगारासू नटराजनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर शार्दूल ठाकूर आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट घेतला. ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल सॅम्स, अँड्रयू टाय, मिचेल स्वीपसन आणि अॅडम झॅम्पा या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला. संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली मात्र त्याला 15 धावांवर माघारी परतावं लागलं. हार्दिक आणि श्रेयसने पाचव्या विकेटसाठी नाबाद 46 धावांची भागीदारी केली. हार्दिक पांड्याने 42 श्रेयस अय्यरने नाबाद 12 धावा केल्या. यापुर्वी टीम इंडियाने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथने 46 धावा केल्या.

Exit mobile version