Thu. Mar 21st, 2019

#AusvIndia: भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

37Shares

महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवने झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 गडी राखून मात केली आहे. याचसोबत भारताने 3 वन-डे सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली आहे, कसोटी मालिकेपाठोपाठ भारताने वन-डे मालिकेतही दमदार विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियातला भारताचा हा पहिलाच वन-डे मालिका विजय ठरला आहे, त्यामुळे भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.

महेंद्रसिंह धोनीने 87 तर केदार जाधवने 61 धावांची खेळी केली. या दोघांनीही चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला आहे. ऑस्ट्रेलियाकडून रिचर्डसन-सिडल आणि स्टॉयनिस यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. सामन्यात 6 बळी घेणाऱ्या युझवेंद्र चहलला सामनावीर तर 2 सामन्यात भारताच्या विजयात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *