#INDvAUS ऑस्ट्रेलियाला २५१ धावांचे आव्हान

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा वनडे सामना सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदारबादमध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामान्यात ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला होता. पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारतानेे ५ सामान्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. नागपुरमधील क्रिकेट एसोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

Live अपडेट –

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा शून्यावर आऊट.

शिखर धवन २१ धावा करत तंबूत परतला.

भारताला तिसरा धक्का अंबाती रायडू माघारी.

विजय शंकर ४६ धावा करत आऊट.

भारताला पाचवा धक्का केदार जाधव ११ धावा करत माघारी

धोनी शून्यावर आऊट

भारताला सातवा धक्का, जडेजा बाद

कर्णधार विराट कोहली तंबूत परतला

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version