Thu. Jun 20th, 2019

#INDvAUS सामना पाहण्यासाठी विजय मल्ल्या पोहोचला ओव्हल मैदानावर

0Shares

सध्या World Cup 2019 स्पर्धा सुरू असून भारतीय संघाचा दुसरा सामना ऑस्ट्रेलियासोबत सुरू आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. मात्र हा सामना बघण्यासाठी भारतीय बॅंकाना गंडा घालून देशाबाहेर पलायन करणारा विजय मल्ल्याने सुद्धा उपस्थिती लावली आहे.

नेमकं काय घडलं ?

भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकासोबत झाला.

या सामन्यात भारताने आफ्रिकेचा पराभाव करत सामना जिंकला होता.

आज भारताचा दुसरा सामना ऑस्ट्रेलियासोबत लंडन येथील ओव्हल मैदानावर रंगला आहे.

हा सामना बघण्यासाठी किंगफिशरचा मालक विजय मल्ल्यानेही हजेरी लावली आहे.

मीडियाशी संवाद साधताना विजय मल्ल्या म्हणाला, मी फक्त सामना बघण्यासाठी आलो आहे.

भारतीय बॅंकना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पलायन केल्याने भारत आणि ब्रिटनमध्ये प्रत्यार्पणावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.

 

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: