Fri. Jan 28th, 2022

#NZvIND पहिल्या वनडेत 8 गडी राखून भारताचा न्यूझीलंडवर विजय    

नेपियरमधील पहिल्या वनडे सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला आहे. न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

त्यानंतर खेळ थांबल्यामुळे डकवर्थ लुईसनुसार एका ओव्हरचा खेळ कमी करून भारताला विजयासाठी 156 धावांचे लक्ष्य देण्यात आलं.

भारताने ते 2 विकेट कमावत 35 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. शिखर धवनने नाबाद 75 धावा करत भारताचा रथ विजयापर्यंत पोहोचवला.

न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय गोलंदाजीसमोर किवी फलंदाजांचा टिकाव लागला नाही.

38 ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 157 धावांवर बाद झाला. केन विल्यम्सनने सर्वाधिक 61 धावा केल्या.

तर भारताच्या कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

केदार जाधवलाही एक बळी मिळाला. शमीने गुप्टिलला आऊट करत वन डेमध्ये 100 विकेट पूर्ण केल्या.

सर्वात कमी मॅचमध्ये 100 विकेट घेणारा फलंदाज तो ठरला आहे. त्याने इरफान पठानच्या 59 मॅचमध्ये 100 विकेटचा विक्रम मोडीत काढला.

न्यूझीलंडने समोर ठेवलेल्या 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली.

रोहित शर्मा लवकर बाद झाला. पण शिखर धवनने एक बाजू लढवत ठेवली होती. तसेच कोहलीनेही त्याला चांगली साथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *