Fri. May 7th, 2021

अखेरच्या सामन्यात भारताचा दमदार विजय; वन डे मालिका 4-1 ने जिंकली

भारत-न्यूझीलंडमध्ये आज 5वा वनडे सामना आहे. वेलिंग्टनच्या पाचव्या वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडला 253 धावांचे आव्हान दिले आहे.

या सामन्यात अंबाती रायडु, हार्दिक पंड्या आणि विजय शंकर या खेळाडूंनी शानदार खेळी केली.

अंबाती रायडू आणि विजय शंकरने पार्टनरशिपमध्ये 98 धावा तर केदार जाधवच्या पार्टनरशिपमध्ये 74 धावा केल्या.

शेवटी आलेल्या हार्दिक पंड्याने 5 षटकार लगावत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

अंबाती रायडुने सर्वाधिक 90 धावा केल्या तर हार्दिक पंड्या विजय शंकरने प्रत्येकी 45-45 धावांचे योगदान दिले.

दरम्यान भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

या सामन्यात विजय शंकर आणि मोहम्मद शमीची संघात पुनरागमन झाले आहे तर दिनेश कार्तिक, खलील अहमद आणि कुलदीप यादवला विश्रांती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *