Wed. Jun 26th, 2019

भारताचा न्यूझीलंडवर 90 धांवांनी विजय, मालिकेत 2-0ने आघाडी

0Shares

माऊंट माऊंगानुई येथील भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यातही दमदार फलंदाजी आणि सुरेख गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडला नमवले.

भारताच्या 324 धावांचा पाठलाग करताना किवी संघ 234 धावांपर्यंत मजल मारू शकला. या विजयासह  भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे.

भारताने न्यूझीलंडसमोर 325 धावांचे आव्हान ठेवले होते. पण त्यांचा संपूर्ण संघ 234 धावांतच गारद झाला. भारताच्या कुलदीपने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

तर चहल आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. शमी आणि केदार जाधवने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

5 वन डे सामन्यांच्या मालिकेत भारताने आता 2-0 ची आघाडी घेतली आहे.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: