Jaimaharashtra news

भारत – न्यूझीलंडमध्ये आज अंतिम सामना

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये शुक्रवारपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये हा महामुकाबला होणार आहे. हा सामना भारतीय संघाने जिंकल्यास विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाच्या वाट्याला आलेलं हे मोठं यश ठरणार आहे.

हा सामना साऊथम्प्टनमधील एजेस बोल या स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. आजपासून सुरू होणार्‍या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी अंतिम सामन्यात भाग घेणार्‍या ११ खेळाडूंची घोषणा केली. अंतिम सामन्यात भारताने तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

आजपासून पुढील चार दिवस क्रिकेटच्या मैदानात जगजेत्तेपदाची कसोटी खेळविली जाणार आहे. आज दुपारी २:३० वाजता विराट आणि केन नाणेफेकीसाठी मैदानात जातील. भारत – न्यूझीलंडच्या अंतिम सामन्याला ३:०० वाजता सुरुवात होईल.

Exit mobile version