#T-20 : भारताचा वेस्ट इंडिजवर 22 धावांनी विजय
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 22 धावांनी विजय झाला आहे. या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 22 धावांनी विजय झाला आहे. या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे हा सामना झाला. भारताने 168 धावांच आव्हान वेस्ट इंडिजने 98 धावांपर्यंत मजल मारली आहे.
भारताचा विजय!
भारतीय सलामीवीरांनी वेस्ट इंडिजविरुद्ध नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी पहिल्या गड्यासाठी 67 धावांची भागीदारी केली.
शिखर धवन बाद झाला आणि भारताला पहिला धक्का दिला. रोहितने अर्धशतक पूर्ण केले. ओशेन थॉमसच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्याने 51 चेंडूत 67 धावा काढल्या. ऋषभ पंतही 4 धावा काढून तंबूत परतला. कर्णधार विराट कोहली फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. तो 28 धावांवर माघारी गेला.
मनिष पांडेही 6 धावांवर बाद झाला. कृणाल पंड्याने रविंद्र जडेजाच्या साथीने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत भारताला 167 या आव्हान वेस्ट इंडीजसमोर ठेवले आहे.
भारताने विजयासाठी ठेवलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने 15 षटकांत 98 धावांपर्यंत मजल मारली. यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला. अखेर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने 22 धावांनी सामन्यात बाजी मारली.