Sun. Jun 20th, 2021

एशिया गेम्स 2018 : आशियाई क्रीडा स्पर्धेत 50 पदकांसह भारताचं अर्धशतक पूर्ण

जय महाराष्ट्र वेब न्यूज, जकार्ता

इंडोनेशियामध्ये सुरु असलेली आशियाई क्रीडा स्पर्धा चांगलीच रंगली आहे. भारताने या स्पर्धेतील पदकांचे अर्धशतक पूर्ण केले आहे तर दुसरीकडे चीनने मात्र पदकांचे द्विशतक पूर्ण केले आहे.

चीनने अजूनही 205 पदकांसह आपला प्रथम क्रमांक टिकवून ठेवला आहे.

भारताचे हे पन्नासावे शतक मिश्र रिले स्पर्धेत मिळाले. 4 बाय 400 मी. मिश्र रिले प्रकारात भारताच्या हिमा दास, पुवम्मा राजू, मोहम्मद अनास आणि अरोकिवाराजीव यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले.

कुराश या खेळप्रकारात भारताने 2 पदके पटकावली आहेत. 50 पदकांसह भारताने आठवे स्थान पटकावले आहे.

भारताने आतापर्यंत 9 सुवर्णपदके पटकावली आहेत, त्याचबरोबर 19 रौप्य आणि 22 कांस्यपदके भारताच्या खात्यामध्ये आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *