Wed. Jun 19th, 2019

#WorldCup2019 भारताचा दणदणीत विजय; रोहित शर्माची दमदार खेळी

0Shares

World Cup 2019च्या पहिल्याच सामन्यात भारताने पहिला विजय मिळवला आहे. भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकासोबत बुधवारी पार पडला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत भारताला 228 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारत संघाचा सलामीवीर रोहित शर्माने दमदार खेळी करत भारताला विजय मिळवण्यात मदत केली. रोहित शर्माने 122 नाबाद धावा करत चांगली कामगिरी बजावली.

भारताचा दमदार विजय –

भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये झालेल्या सामन्यात भारताचा दमदार विजय झाला आहे.

नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दक्षिण आफ्रिकेने भारताला 228 धावांचे आव्हान दिले.

सलामीवीर रोहित शर्माने नाबाद 122 धावा करत भारताला विजयी ठरवले.

त्याचबरोबर महेंद्रसिंह धोनीने चांगली कामगिरी बजावली.

भारत संघाकडून फलंदाजीची सुरुवात झाली नसून शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांना आपल्या धावांचे खाते उघडण्यात यश मिळाले नाही.

मात्र शिखर माघारी परतल्यानंतर विराटने रोहित शर्माला चांगली साथ दिली.

विराट कोहली बाद झाल्यानंतर रोहितला लोकेश राहुलने साथ दिली.

मात्र लोकेश राहुलला दक्षिण आफ्रिकाचे गोलंदाज रबाडाने तंबूत पाठवले.

महेंद्रसिंह धोनीने रोहित शर्माला चांगली साथ दिली.

मात्र आव्हानाच्या जवळ असतानाच महेंद्रसिंह धोनी झेलबाद झाला.

हार्दिक पांड्याच्या साथीने रोहित शर्माने भारताला विजय मिळवून दिला.

त्याचबरोबर भारत संघाचे गोलंदाज युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांनीही चांगली कामगिरी बजावली.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: