Thu. May 19th, 2022

#INDvsPAK भारताचा दणदणीत विजय; देशात आनंदाचे वातावरण

World Cup 2019 सुरू असून रविवारी भारत-पाकिस्तानमध्ये महामुकाबला झाला. या महामुकाबलामध्ये भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 336 धावा करत पाकिस्तानला मोठे आव्हान दिले. मात्र पावसाने हजेरी लावल्यामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार पाकिस्तानने सामना 40 ओव्हरमध्ये खेळला आणि त्यांचा 89 धावांनी पराभव झाला.

भारताचा दणदणीत विजय –

इंग्लंडच्या मॅंनचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर हा सामना रंगला.

भारताने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानला 337 धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला हे आव्हान पेलवले नाही.

पाऊस पडल्यामुळे पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 ओव्हरमध्ये 302 धावांचे आव्हान मिळाले.

मात्र पाकिस्तानने केवळ 40 ओव्हरमध्ये 212 धावा करत आपला खेळ आटोपला.

हिट मॅन रोहित शर्माने 140 धावा करत धडाकेबाज खेळी केली.

तर कर्णधार विराट कोहली आणि राहुलने अर्धशतक पूर्ण करत चांगली कामगिरी बजावली.

विराट कोहलीने 77 धावा करत राहुलने 57 धावा केल्या.

भारताने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत.

त्यापैकी 3 सामन्यामध्ये दणदणीत विजय मिळवला आणि न्यूझीलंडबरोबर सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे 1-1 गुण मिळवून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.