Mon. Jul 22nd, 2019

AusVInd : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय

27Shares

महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. केदार जाधवने नाबाद 81 तस धोनीने नाबाद 59 धावांची धमाकेदार खेळी केली. 6 गडी राखून भारताने ऑस्ट्रेलियाचं आव्हान पार केलं. 5 साम्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी केली आहे.

 

केदार जाधवने गोलंदाजी करताना स्टॉयनिससारखी महत्त्वाची विकेट मिळवली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाचे 7 गडी बाद झाले. त्यांची मजल 236 धावांपर्यंतच गेली. ऑस्ट्रेलियन कॅप्टन फिंच शून्यवर आऊट झाला.

 

भारताकडून शमीने भेदक मारा केला

बुमराचीही त्याला चांगली साथ लाभली.

शमीने चांगला खेळ करत यावेळी 10 षटकांत 44 धावा केल्या आणि 2 बळी मिळवले.

कुलदीपनेही चांगला फिरकी मार केला.

दोन फलंदाजांना 10 षटकांत 46 धावा देत बाद केलं.

जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या धावांची गती कमी केली.

27Shares

Leave a Reply

%d bloggers like this: