Tue. Sep 28th, 2021

एशियन गेम्स 2018 : 20 वर्षीय नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी

जय महाराष्ट्र वेब न्यूज, जकार्ता

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत सोमवारी सुवर्ण इतिहास घडवला आहे. नीरज चोप्रा हा आशियाई स्पर्धेत भालाफेक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

20 वर्षांच्या नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 67 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा भारताला सुवर्णपदक जिंकून दिले आहे.

नीरजने 88.06 मीटर भालाफेक करून स्वतःच्याच नावे असलेला राष्ट्रीय विक्रम मोडला आणि आशियाई स्पर्धेचं सुवर्णपदक नावावर केलं आहे.

गेल्या 2 वर्षांतील महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील नीरजचे हे चौथे सुवर्णपदक ठरले आहे. या प्रकारात यापूर्वी भारताला 1982 मध्ये गुरतेजसिंह यांनी कांस्यपदक मिळवून दिले होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *