Thu. Jan 27th, 2022

#IndvAus : अटीतटीच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा 8 धावांनी विजय

भारत- ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असणाऱ्या दुसऱ्या ODI सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. या सामन्यात भारताने 251 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियापुढे ठेवलं होतं.  सामना अत्यंत रंगतदार वळणावर पोहोचला होता. भारताचा 8 धावांनी विजय झाला.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. Faster Baller पॅट कमिन्स याने मेडन ओव्हर टाकली.

तसंच हिटमॅन रोहित शर्माला देखील शून्य धावांवर बाद केलं. शिखर धवन 21 धावांवर LBW झाला.

तर लायनच्या पहिल्याच over मध्ये अंबाती रायडू LBW झाला.

भारताने याबद्दल DRS ची मदत घेतली. मात्र निकाल भारताच्या विरोधात गेला. त्यामुळे तो एकमेव review भारताने गमावला.

कॅप्टन विराट कोहलीने या सामन्यात 107 बॉल्समध्ये 116 धावा काढल्या.

हे त्याच्या कारकीर्दीतील 40 वं शतक ठरलं.

मात्र विजय शंकर 46 धावांवरच run out झाला.

केदार जाधव आणि महेंद्र सिंग धोनीदेखील यावेळी आपला करिश्मा दाखवू शकले नाहीत.

जडेजा, कोहलीनंतर कुलदीप यादवही बाद  झाला. बूमरा शून्यवर आऊट झाला.

पॅट कमिन्सच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताचे 4 गडी तंबूत परतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *