Thursday, September 12, 2024 11:18:20 AM

Jan Dhan
'जन धन'मध्ये ५३.१३ कोटी खाती, योजनेला १० वर्षे पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या जन धन योजनेला दहा वर्षे पूर्ण झाली. जन धन योजनेत आतापर्यंत ५३.१३ कोटी खाती उघडण्यात आली आहेत.

जन धनमध्ये ५३१३ कोटी खाती योजनेला १० वर्षे पूर्ण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या जन धन योजनेला दहा वर्षे पूर्ण झाली. जन धन योजनेत आतापर्यंत ५३.१३ कोटी खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांच्या माध्यमातून बचतीला चालना देण्यात आली आहे. केंद्र सरकारने २८ ऑगस्ट २०१४ रोजी जन धन योजनेला सुरुवात केली. या योजनेत आतापर्यंत २.३ अब्ज रुपये जमा झाले आहेत. जन धन योजनेतील ८० टक्के खाती आजही सक्रीय आहेत. केंद्र सरकार ११ कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या जन धन खात्यातच विविध सरकारी योजनांचे पैसे थेट हस्तांतरित करते. 

पंतप्रधान जनधन योजना या महत्त्वाकांक्षी योजनेला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील दशकभरात या योजनेतून देशभरात एकूण ५३.१३ कोटी जनधन खाती विविध बँकांमध्ये उघडण्यात आली आहेत. अर्थ मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. जनधन खात्यांमध्ये जमा असलेली एकूण रक्कम आता २,३१,२३६ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान जनधन योजनेची घोषणा केली होती. सर्वसामान्य नागरिकांना बँकिंगच्या कक्षेत आणणे हा योजनेमागचा मुख्य उद्देश होता. 


सम्बन्धित सामग्री