२८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: गुजरातमधील कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.० इतकी नोंद झाली. त्याचा परिणाम अनेक भागात दिसून येत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू भचाऊच्या उत्तर-ईशान्येस २१ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही.
दिल्ली-एनसीआर, पंजाबसह चंदीगड आणि जम्मू काश्मीरमध्ये भूकंपामुळे जमीन हादरली. भूकंपाचे हे धक्के बराच वेळ जाणवत होते. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. हिंदुकुश प्रदेशात रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.२ होती.