114 flights cancelled from Delhi airport
Edited Image
नवी दिल्ली: विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दिल्ली विमानतळावरून 114 उड्डाणे रद्द करण्यात येणार आहेत. पुढील तीन महिने ही सर्व उड्डाणे रद्द राहतील. ऑपरेटर डायलने शुक्रवारी सांगितले की, धावपट्टी सुधारणेच्या कामासाठी धावपट्टी बंद असल्याने 15 जूनपासून तीन महिन्यांसाठी 114 उड्डाणे रद्द केली जातील. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (डायल) नुसार, रद्द केलेल्या उड्डाणांची संख्या एकूण दैनंदिन उड्डाणांच्या 7.5 टक्के आहे.
प्राप्त माहितीनुसार, रनवे आरडब्ल्यू 10/28 सुधारण्याचे काम आता 15 जून ते 15 सप्टेंबर दरम्यान केले जाईल. धावपट्टीवर विमानांची जास्त हालचाल झाल्यामुळे हे काम मे महिन्यात पुढे ढकलण्यात आले होते. धावपट्टी CAT-III अनुरूप करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (ILS) अपग्रेड केली जाईल, ज्यामुळे धुक्यात कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही उड्डाणे शक्य होतील.
हेही वाचा - Weather Update: देशातील 'या' 12 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस; IMD जारी केला इशारा
दरम्यान, देशातील सर्वात मोठ्या आणि व्यस्त इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGIA) दररोज सुमारे 1450 उड्डाणे चालतात. IGIA मध्ये RW09/27, RW11R/29L, RW11L/29R आणि RW10/28 चार धावपट्ट्या आहेत. तसेच T1 आणि T3 हे टर्मिनल आहेत. टर्मिनल T2 सध्या देखभाल कामासाठी बंद आहे.
हेही वाचा - Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा आराखडा तयार; CRPF, जम्मू काश्मीर पोलिस आणि लष्कर घेणार सुरक्षेची जबाबदारी
याशिवाय, डायलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विदेह कुमार जयपुरियार यांनी सांगितले की, '15 जूनपासून तीन महिने RW10/28 कार्यरत राहणार नाही. आम्हाला त्या धावपट्टीत सुधारणा करायची आहे, जेणेकरून येणाऱ्या कोणत्याही समस्येपासून सुटका मिळेल.'