Monday, November 17, 2025 12:29:57 AM

Luxury Train In India: 20 लाखांचं तिकीट अन् पाचतारांकित सुविधा! भारतातील 'या' लक्झरी ट्रेनची जगभरात चर्चा

नावाप्रमाणेच ही ट्रेन खऱ्या अर्थाने राजेशाही थाटात प्रवासाचा अनुभव देते. ही ट्रेन इतकी आलिशान की तिला 'रेल्वेवरील फाईव्ह स्टार हॉटेल' म्हटले जाते. तिच्या तिकिटाची किंमत थेट लाखोंमध्ये आहे.

luxury train in india 20 लाखांचं तिकीट अन् पाचतारांकित सुविधा भारतातील या लक्झरी ट्रेनची जगभरात चर्चा

Luxury Train In India: भारतीय रेल्वेचा विचार करताच राजधानी, तेजस आणि वंदे भारत अशा आरामदायी गाड्या आपल्या लक्षात येतात. पण यापेक्षाही काही पावलं पुढे असलेली एक ट्रेन आहे, ‘दि महाराजा एक्सप्रेस.’ नावाप्रमाणेच ही ट्रेन खऱ्या अर्थाने राजेशाही थाटात प्रवासाचा अनुभव देते. ही ट्रेन इतकी आलिशान की तिला 'रेल्वेवरील फाईव्ह स्टार हॉटेल' म्हटले जाते. तिच्या तिकिटाची किंमत थेट लाखोंमध्ये आहे. 

राजेशाही थाटातील रेल्वे प्रवास

‘दि महाराजा एक्सप्रेस’ ही भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) अंतर्गत चालवली जाणारी लक्झरी टुरिस्ट ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये बसल्यानंतर तुम्हाला वाटेल, जणू तुम्ही एखाद्या राजवाड्यात प्रवेश केला आहे. भिंतींवरील नाजूक सजावट, पारंपरिक कलाकुसर, मखमली आसनं आणि राजघराण्यांना शोभेल असे इंटिरियर प्रत्येक कोचमध्ये वैभवाचे दर्शन घडते.

तिकीट लाखोंमध्ये, पण अनुभव अमूल्य

या ट्रेनच्या एका पूर्ण प्रवासाचे तिकीट सुमारे 20 लाख रुपयांपर्यंत असते. परंतु या किंमतीत केवळ रेल्वे प्रवास नाही, तर संपूर्ण आलिशान टूर पॅकेज समाविष्ट असते. यामध्ये पाचतारांकित हॉटेल दर्जाचे निवास, जगभरातील चवदार खाद्यपदार्थ, प्रीमियम ड्रिंक्स, एसी बसने साईटसीइंग आणि प्रत्येक थांब्यावर राजेशाही स्वागत याचा समावेश आहे. 

हेही वाचा - Viral Video: शेतकरी बापाने मुलीच्या स्कुटीसाठी जमा केली 40 हजारांची नाणी, पोतं घेऊन थेट शोरुममध्ये पोहोचला

चार प्रकारच्या केबिन्स

या ट्रेनमध्ये प्रवासासाठी चार प्रकारच्या आलिशान केबिन्स उपलब्ध आहेत. यात डिलक्स केबिन, ज्युनियर स्युट, स्युट, प्रेसिडेन्शियल स्युट अशा केबिन्स आहेत. जिथे प्रत्येक सुविधा राजेशाही स्वरुपाची आहे. प्रत्येक केबिनमध्ये खासगी बाथरूम, 24x7 सेवा, टेलिव्हिजन, इंटरनेट आणि वैयक्तिक बटलर अशा सर्व सुविधा दिल्या जातात.

7 दिवसांची शाही सफर

‘दि महाराजा एक्सप्रेस’ साधारण 7 दिवस आणि 6 रात्रींचा प्रवास करते. ज्यामध्ये सुमारे 27 हजार किलोमीटरचा प्रवास केला जातो. या प्रवासात भारतातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाने नटलेल्या ठिकाणांचा समावेश आहे. यात  आग्रा, जयपूर, उदयपूर, रणथंबोर, वाराणसी या ठिकाणांची सफर केली जाते. ही सफर म्हणजे भारताच्या इतिहास, संस्कृती आणि निसर्गसौंदर्याचा एक राजेशाही प्रवास आहे. 

हेही वाचा - Delhi Taj Hotel: ताज हॉटेलमध्ये कोल्हापुरी चप्पल आणि मांडी घालून बसण्यावरून महिलेला अपमानास्पद वागणूक, व्हिडीओ शेअर करत महिला संतापली

भारतीय रेल्वेचा गौरव

‘दि महाराजा एक्सप्रेस’ ही केवळ ट्रेन नसून, भारतीय रेल्वेच्या वारशाचा आणि आधुनिक लक्झरीचा संगम आहे. तिच्या वैभवामुळेच जगभरातील पर्यटक या प्रवासाची स्वप्नं पाहतात, कारण एकदा का तुम्ही या ट्रेनमध्ये बसलात, की पुढचे सात दिवस म्हणजे राजेशाही जीवनाचा अनुभवच!


सम्बन्धित सामग्री